Siddharth Shirole : शिवाजीनगर एसटी स्थानक लवकरच पूर्वीच्या जागी, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी 

पुणे : मेट्रोच्या कामामुळे स्थलांतरित झालेले शिवाजीनगर एसटी स्थानक लवकरच पूर्वीच्या जागी उभे राहील, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे ( Siddharth Shirole) यांनी दिली.

या स्थानकाच्या स्थलांतराबाबत उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमवेत सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर चर्चा सर्कीट हाऊसवर झालेल्या बैठकीत केली. एसटी स्थानकाचे स्थलांतर लवकरच मूळ जागी करावे, अशी विनंती शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री पवार यांना केली. लगेचच पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर एसटी स्थानक हलविण्याचे काम लवकर करण्याचे निर्देश महा मेट्रोच्या प्रशासनाला पवार यांनी दिले.

एसटी स्थानक स्थलांतर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि महा मेट्रो (पुणे) यांच्यात करार अंतिम टप्प्यात असून, महा मेट्रो हे काम पूर्ण करणार आहे. हा प्रकल्प लवकर व्हावा, यासाठी दोन्ही बाजू प्रयत्न करणार आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

सध्या शिवाजीनगर एसटी स्थानके वाकडेवाडी येथील जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जाऊन येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मध्य वस्तीत येण्यासाठी प्रवासाचा खर्च होतो.

Shivajinagar ST Stand in the previous place soon MLA Siddharth Shirole confirmed

महत्वाच्या बातम्या