अमरावतीहून कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं

विशेष प्रतिनिधी

पुणे : अमरावतीहून कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या कुटुंबावर रविवारी रात्री काळाने घाला घातला. वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने या अपघातात दोन बालकांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

केसनंद फाट्यावर एका भरधाव येणार डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर आहे. हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. हे सर्वजण कामगार असून ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. या अपघातावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते.


मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम


विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार वय ,( 1 वर्ष ) आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नगेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18) आलिशा विनोद पवार (47) अशी या ६ जणांची नावे आहेत. जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे. हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत.

आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (26) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवार यांनी सांगितले, रात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात घडला. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो, अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो, समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेचना. आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंतच सगळा खेळ खल्लास झाला होता, तिघजणं तर जागीच ठार झाले होते, रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही. इतर जखमींना कसंबस रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकल नाही. ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता.

Dumper crushed 9 people sleeping on the pavement

महत्वाच्या बातम्या