Ram Kadam : काँग्रेसला बाबासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, राम कदम यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंतप्रधान बनण्याची संधी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर मिळायला हवी होती पण काँग्रेसने दिली नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली.



केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेस आंदोलन करत आहे. यावर टीका करताना कदम म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतरत्न देखील त्यांना मिळायला पाहिजे होतं. पण दिलं नाही 1990 मध्ये व्ही.पी सिग यांच सरकार आले. त्या सरकारला भाजपच समर्थन होतं त्यावेळेस डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न मिळालं. बाबासाहेबांचा कायम द्वेष करणारे लोक पायऱ्यावर बसणार आहेत.आमच्यासाठी बाबासाहेब पुजनीय आहेत

Congress has no moral right to talk about Babasaheb, Ram Kadam said

महत्वाच्या बातम्या