विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत, प्रताप सरनाईक यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचे पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले, विनोद कांबळी यांची प्रकृती सध्या खूप चांगली आहे. आमची वानरसेना नावाची संस्था आहे.

कोणाला गरज असेल तर महिना दोन महिन्यात मदत करतात. काही महिन्यापूर्वी वानरसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणे झाले . संस्थेच्या माध्यमातून २० लाख जमा झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगितल होतं म्हणून मी भेटायला आलो होतो. विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या नावाने ३० लाख रुपयांची रक्कम जमा करायला सांगितले आहे.

गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती हॉस्पिटल हे तीन हॉस्पिटल प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध आहेत. आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे असे विनोद कांबळी याला सांगितलं आहे. ९३-९४ साली लग्न झाल्यावर लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने माझ्या फार्म हाउसवर साजरा केला होता, अशी आठवणही सरनाईक यांनी सांगितली.

गरज नसताना त्याने काही चूक केल्या. त्या तो आता भोगतोय. त्याने सांगितला आहे आता पुन्हा चूक होणार नाही, असे ते म्हणाले.

कोणत्याही अधिकाऱ्यांना न सांगता एसटी आगारांना भेट देणार असल्याचेही प्रताप सरनाईक म्हणाले. उद्या मी तीन अगारांना भेट देणार आहे. पण कोणत्याही अधिकाऱ्याला सांगणार नाही.आधी अधिकाऱ्यांना सांगितलं तर टापटीप पण दिसते. ग्रामीण भागात देखील पाहणी करणार आहे. रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. केबल कारच्या माध्यमातून वाहतूक करू शकतो का हे पाहणी करणार आहे. केबल कारसंदर्भात नितीन गडकरींना भेटणार आहे, असे सरनाईक सांगितले.

दालन वाटप नाराजीबाबत ते म्हणाले, नाराजीचे काहीतरी कारण तरी असायला हवं. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री बनवले. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरची दालनं मला मिळाली. नाराजी न बाळगता जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडायची आहे. मला तीन दालने मिळाली आहेत. त्यातले अजून एक कोणाला हवं असेल तर दिलं तरी हरकत नाही

30 lakh rupees help to Vinod Kambli, informed by Pratap Sarnaik

महत्वाच्या बातम्या