विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री पदाचा निर्णय मोदी, शाह जो घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर पडता पडला आहे.
निवडणुकीचे निकाल लागल्यापासून शिंदे गटाचे काही आमदार मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे स्वागत यासाठी मागणी करत होते. राज्यात अनेक ठिकाणी याबाबत देवापुढे आरत्याही सुरू आहेत. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी स्पष्ट सांगितल्याने एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
केसरकर म्हणाले, येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल, त्यासंदर्भात उद्या बीजेपीची कदाचित मिटिंग होईल. त्यानंतर तीनही नेते पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ते जो काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन करतील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. पण तिनही पक्षानी सांगितलं आहे जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो मान्य असेल.
फॅारमॅलिटी नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सूपूर्त केला आहे. कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळण्यास राज्यापालांनी शिंदे यांनी सांगितलं आहे. येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल, त्यासंदर्भात उद्या बीजेपीची कदाचित मिटिंग होईल. त्यानंतर तिनही नेते पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ते जो काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापण करतील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पण तिनही पक्षानी सांगितलं आहे जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो मान्य असेल, असे केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतुद असते. सरकारचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. ज्यावेळी तिनही मंत्र्यांना दिल्लीला बोलावलं जाईल तेव्हा ते जातील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.