Sanjay Raut : शिंदेंना कोणते टॉनिक मिळाले की दिल्लीकडे डोळे वटारण्याचं धाडस? संजय राऊत यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  अडीच-तीन वर्षांपूर्वी जे लोक ईडी-सीबीआयला घाबरुन, दिल्लीतल्या गृह मंत्रालयाला घाबरुन ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना तीन वर्षात असं कोणतं टॉनिक मिळालं, ते दिल्लीला डोळे वटारुन दाखवतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करत आहे. हा भाजपचा अंतर्गत खेळ आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला Sanjay Raut

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात, असं टि्वट अंजली दमानिया यांनी केलय, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे” “महाराष्ट्रात जे सुरु आहे,



एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जे रुसवे-फुगवे सुरु आहेत, त्यामागे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करत आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला. “दिल्लीतली एखादी महाशक्ती ती कोणत्या पक्षाची आहे, काय, तुम्हाला सर्व माहिती आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारच धाडस करु शकत नाहीत. सध्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांसमोर असे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिम्मत आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अजून राज्यात सरकार यायचं आहे. तिथे माळशिरसमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पण लोकांना वाटतय. विजयी उमेदवाराला कमी मत मिळाली आहेत, म्हणून ते जिंकून सुद्धा फेरतमदान घेतायत” असं संजय राऊत म्हणाले.

ज्यांनी मतदान केलय, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर विश्वास नाहीय. गावागावात लोक फेरमतदान घेतायत, यावर निवडणूक आयोगाने भाष्य केलं पाहिजे. आज माळशिरसमधल्या मारकंडवाडीत 144 कलम लावलं आहे. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचं आहे. तिथे माळशिरसमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पण लोकांना वाटतय. विजयी उमेदवाराला कमी मत मिळाली आहेत, म्हणून ते जिंकून सुद्धा फेरतमदान घेतायत” असं संजय राऊत म्हणाले.

What tonic did Shinde get to dare to open his eyes to Delhi? Question by Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या