Vijay Wadettiwar विजय वडेट्टीवार यांनी शेवटी ईव्हीएमलाच दिला दोष

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे. भाजप कितीही दावा करत असला तरी विजय ईव्हीएमचा असून ईव्हीएमला हार घालून विजय साजरा करावा असे म्हणत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाला ईव्हीएमला दोषी धरले आहे. त्यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली असून सरकारच्या यशावर प्रश्नेचिन्ह उपस्थित केले आहे. Vijay Wadettiwar Ultimately Blames EVM for Defeat

शेतकरी, महागाई, आणि बेरोजगारीचे प्रश्न यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकरी संकटात आहेत. सोयाबीन आणि कापूस विकला जात नाही, पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तरी मदत पोहोचली नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. या सगळ्या समस्यांमुळे सरकारविरोधी वातावरण असूनही असे निकाल का लागले, हा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, “शेवटच्या टप्प्यात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये वाद होता. उलट, महाविकास आघाडीत कोणताही वाद नव्हता आणि आम्ही एकत्र काम केले. त्यामुळे हा निकाल धक्कादायक असून तो पचवणं अवघड आहे.
वडेट्टीवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत भाजपने त्यांना पुढे आणावे असे सुचवले. “योगी जिथे जातात तिथे भाजप जिंकते, पण मोदी जिथे जातात तिथे भाजप हरते,” असे ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, “आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईल, पण ते शेतकऱ्यांच्या आणि सामान्य लोकांच्या समस्यांवर काय उपाय करते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका ठामपणे पार पाडू.
नाना पटोले यांच्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले, मला आता प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे, या संदर्भात पटोले यांनी हायकमांडकडे नक्की काय भूमिका मांडली याची माहिती घेतो आहे

अशोक चव्हाण यांनी केलेल्या आरोपाबात वडेट्टीवार म्हणाले, त्रास कोणी दिला, अशोक चव्हाण संयमी आहेत त्यांची बदला घेण्याची भूमिका कधीच नसते

Vijay Wadettiwar Ultimately Blames EVM for Defeat

महत्वाच्या बातम्या