Shinde : आमदारांच्या विरोधामुळे शिंदेंच्या या मंत्र्यांना मिळणार डच्चू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shinde माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनीच विरोध केला होता. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात. प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करत असल्याने यातील काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.Shinde

दादा भुसे, गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे पुन्हा मंत्रिमंडळाच्या संभाव्या यादीत आहेत. त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.



शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 मंत्रिपदे आणि 3 राज्यमंत्रिपदे मिळणार आहे. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. पण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात आली आहे.\

संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे. प्रताप सरनाईक आणि आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट हे आहेत. योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावरकर अथवा प्रकाश आबिटकर यांना राज्य मंत्री पद मिळू शकते.

These ministers of Shinde will be dropped due to the opposition of MLAs

महत्वाच्या बातम्या