Jitendra Awad : बीडमध्ये व्हायरल झालेला व्हॉट्स अप चॅट माझा नाही, जितेंद्र आव्हाड यांचा खुलासा

 

विशेष प्रतिनिधी

ठाणे : Jitendra Awad मी वैयक्तिक चॅट मराठीत करत नाही. इंग्लिशमध्ये मराठी टाईप करतो. त्यामुळे बीडमध्ये व्हायरल झालेला व्हॉट्स अप चॅट माझा नाही असा खुलासा Jitendra Awad

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.आव्हाड म्हणाले, बीडमधील मोर्चात माझे काल भाषण संपले. त्यानंतर व्हॉट्स अप चॅट व्हायरल झाला .मी वापरत असलेला फोन आणि चॅट वरील सिग्नल वेगळे वेगळे आहेत. माझे मराठीतील लेख वैगरे माझा खाजगी माणूस टाईप करतो



या लोकांची घाणेरडी मानसिकता आहे असा आरोप करत आव्हाड म्हणाले, त्या चॅटमध्ये असं लिहिलं आहे की दलित, मुसलमान यांना घेऊन ये. दलित आणि मुस्लिम बाजारात विकत ठेवेल आहे का? दिपक केदारं नाव आले कुठुन ? तो आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता आहे. यांच्या मनात किती जाती धर्मद्वेष भरला आहे हे दिसते.आम्ही गु्न्हा दाखल केला आहे.

दुर्दैवाने यात एक वकील आहे. त्यांनी सांगावे कोणी चॅट दिला आहे. एसपीला विनंती आहे या बाबत बघावे. भाषण संपल्या संपल्या कसा काय चॅट आला? फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे. या व्हॉटस अप बाबत कोणाला अटक करावी व करू नये हे ते मला महिती नाही. पण प्रकरण समोर आले पाहिजे. खोटं बोलताना पण अक्कल लागते.

मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ असा मॅसेज मला आला आहे. नंबर देखील शोधत आहे. मला धमकी द्या, मी घाबरणार नाही. मी शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ता आहे. मी अजित पवार यांना एकेरी शब्द बोलत नाही. सन्मानाने मी अजित पवार, अजित दादा बोलतो.

The WhatsApp chat that went viral in Beed is not mine, reveals Jitendra Awad

महत्वाच्या बातम्या