Thackeray MP ठाकरेंचा खासदार महिला उमेदवाराला म्हणाला ‘ माल’

विशेष प्रतिनिधी

निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणातील सुसंस्कृतताच संपू लागली आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. इम्पोर्टेड आणि ओरिजनल माल असा शब्द वापरल्याने शायना एन. सी यांनी संताप व्यक्त केला आहे. Thackeray MP Calls Woman Candidate ‘Mal’

भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत अपशब्द वापरला आहे. यावरून शायना एन. सी यांनीही त्यांना शाब्दिक चपराक लगावली आहे.

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या.

परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.

शायना एनसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर वक्तव्याचा निषेध केला.

Thackeray MP Calls Woman Candidate ‘Mal’

महत्वाच्या बातम्या