Sushma Andhare : तानाजी सावंत व धर्मराव आत्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुषमा अंधारे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बीड येथील आंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बनावट औषध पुरवठा प्रकरणी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

अंधारे यांनी आरोप केला की सावंत यांनी टेंडर प्रक्रियेतून पारंपारिक औषध खरेदीच्या पद्धतीला बगल देत स्वतंत्र यंत्रणा उभारली. या प्रक्रियेत अन्न व औषध प्रशासनाने कंपन्यांना प्रमाणपत्र देताना कोणतीही योग्य तपासणी केली नाही. ही जबाबदारी तत्कालीन मंत्री आत्राम यांची होती. सावंत यांनीही प्रमाणपत्रे क्रॉस चेक न करता बनावट औषध खरेदीला मान्यता दिली.

Raj Thackeray : महापालिकेसाठी राज ठाकरे महायुतीत? जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू, मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत

अंधारे म्हणाल्या की या गैरव्यवहारामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देऊ नये. तसेच या प्रकरणावर सभागृहात लढा देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही लढाई लढू,” असे त्या म्हणाल्या.

या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Sushma Andhare demand to file a case against Tanaji Sawant and Dharmarao Atram

महत्वाच्या बातम्या