Somnath Suryavanshi दहा लाखांची मदत नको, मारहाण करणाऱ्या पोलिसांना जन्मठेप द्या, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची मागणी

विशेष प्रतिनिधी

परभणी : आम्हाला सरकारची दहा लाखांची मदत मान्य नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना जन्मठेप द्या अशी मागणी परभणी येथे कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सला सूर्यवंशी यांनी केली आहे.

परभणी प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला राज्य सरकारने आज दहा लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. यानंतर आम्हाला ही मदत मान्य नाही अशी प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने दिली आहे. त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे मान्य नाही, माझ्या मुलाचा मारहाण करुन जीव घेतला आहे.

Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला

मला दहा लाख रुपयांची गरज नाही आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या मुलाला कसलाही आजार नव्हता हे सर्व खोटं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना जन्मठेप द्या.

देवेंद्र फडणवीसांनी बोललेलं पूर्ण चुकीचे आहे. आम्ही गरीबांची मुलांनी शिक्षण घ्यावे की गुन्हेगारीच्या मार्गाने जावं हे फडणविसांनी सांगितले आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ अविनाश सूर्यवंशी याने दिली आहे.

Somnath Suryavanshi’s mother demands

महत्वाच्या बातम्या