Kirit Somaiya : प्रचारामुळे शरीरावर ताण आल्याने शिंदे आजारी, किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, प्रचारामुळे त्यांच्या शरीरावर ताण आला होता, मात्र तरीही ते महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी धडपड करत आहेत. सोमय्या यांनी विश्वास व्यक्त केला की, उपचार घेतल्यावर शिंदे लवकरच बरे होतील आणि पुन्हा मैदानात येतील.Kirit Somaiya

“आपण सर्व माणसं आहोत. प्रचाराचा ताण कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळी भाषा वापरून त्यांच्या प्रकृतीबद्दल संभ्रम निर्माण करू नये,” असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या सरकारची स्थापना आणि त्यावरील प्रक्रिया प्रोटोकॉलनुसार सुरू असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. सरकारच्या सर्व संबंधित घटकांना निमंत्रण पाठवले गेले आहे. “एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने त्यांच्या जबाबदारीत अडथळा येत असला तरी महायुती सरकारच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत,” असे ते म्हणाले.



निवडणुका पारदर्शक आणि सिक्रेट पद्धतीने घेतल्या जात असल्याचे सांगताना सोमय्या यांनी स्पष्ट केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहे, त्यानुसार निवडणूक आयोग आपल्या कामकाजात त्रुटी असल्यास उपाययोजना करण्यासाठी सक्षम आहे.”

ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात जाऊन ईव्हीएमबाबत आक्षेप घेतला, पण त्यांनी लोकसभेत विजय मिळवला तेव्हा ईव्हीएम योग्य होते. याचा विचार करणे आवश्यक आहे.”

महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांना निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्यासाठी बोलावले आहे. “जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत,” असे आवाहन करत सोमय्या यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या भूमिकेवर आरसा दाखवण्याचा सल्ला दिला.

प्रचाराच्या ताणामुळे एकनाथ शिंदे आजारी पडले असले तरी उपचारानंतर ते लवकरच बरे होऊन महायुतीच्या कार्यात सक्रिय होतील, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. “शिंदे यांचा आत्मविश्वास आणि महायुतीचे उद्दिष्ट त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल,” असे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील अडथळे दूर करून लवकरच त्याचे यश पाहायला मिळेल, अशी आशा सोमय्या यांनी व्यक्त केली.

Shinde sick because stress on body due to campaign, Kirit Somaiya explains

महत्वाच्या बातम्या