Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात, हिंदुत्व आमची संस्कृती, आमचे जीवन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचं बोट पकडून त्यांना हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. त्या वाटेवर सुद्धा यांनी खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतात ? हिंदुत्व आमचे जीवन आहे, हिंदुत्व आमची संस्कृती आहे, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.Sanjay Raut

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, भाजपच्या डोक्यात सडके कांदे, बटाटे आहेत. हे हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजप वाल्यांना हिंदुत्व कोणी शिकवलं?



हिंमत असेल तर सावरकर यांना भारतरत्न द्या मग हिंदुत्वावर बोला. कोणी रॅली काढत नाही भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसला आहे

निकाल लागल्यावर ईव्हीएमच्या माध्यमातून शैतानी बहुमत ओरबडल्यावर सुद्धा एक महिना हे सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकत नाहीत. राज्यामध्ये रोज हत्या, दरोडे, बलात्कार, लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते आहे. राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडत आहेत. गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत कसलं राज्य आहे ? असा सवाल करत राऊत म्हणाले तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाही. दिल्लीत जावं लागत आहे. मला या राज्यातील चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार राज्य चालवू शकत नाही तर या राज्याचे काय होणार ?

राऊत म्हणाले, हळूहळू एक एक प्रकरण समोर येत जातील. तुम्ही कोणालाही मंत्री करा. तीन पक्षाचेच लोकं एकामेकांच्या विरुद्ध फायली आणून देणार आणि फायली यायला सुरुवात झाली आहे. या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, उद्धव ठाकरे उद्या नागपुरात चालले आहेत तिथे महत्त्वाचा विषयावर चर्चा होईल. या अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो

या राज्याला आरोग्य खातेच नाही आहे. अगोदर जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना लाज वाटली पाहिजे. स्वतःला मलाईदार खाती पाहिजे. ग्रामीण भागात मराठवाड्यात ज्यांच्यावर डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत ते रस्त्यावर थंडीत कुडकुडत आहेत.

दादरमध्ये मंदिर 80 वर्षांपूर्वी हमालांनी बांधले आहे. आज संध्याकाळी तिकडे महाआरती होईल. या महाआरतीमध्ये मी, युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार महेश सावंत तिथे हजारो शिवसैनिक, हमाल बांधव सामील होतील, असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut says, Hindutva is our culture, our life

महत्वाच्या बातम्या