Sameer Bhujbal समीर भुजबळ महाविकास आघाडीत, काय म्हणाले छगन भुजबळ

विशेष प्रतिनिधी

समीर भुजबळ अपक्ष लढणार. महाविकास आघाडीकडे जाणार, कधी तुतारी हातात घेणार, कधी मशालीकडे जाणार अशी सर्व चर्चा तुम्हीच लावली आहे. पण समीर भाऊ कुठेच गेले नाहीत आज पण फॉर्म भरताना ते माझ्यासोबत दिसतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, अपक्ष लढणार किंवा काय असे मला काही त्यांनी सांगितलं नाही. सगळी मंडळी स्वतःचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. आपण महायुती आणि आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आदेश दिल्याने पुन्हा निवडणुकीला उभे राहिलो 1985 पासून विधानभवनात आहे, तुमच्या आशीर्वादाने आणखी पाच वर्ष बसणार. आमच्या पक्षाने मला सांगितलं परत तुम्हालाच उभं राहायचे आहे. येवला लासलगाव मतदार संघातील नागरिकांचा देखील आग्रह आहे त्यामुळे फॉर्म भरतो आहे.

माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार

भुजबळ म्हणाले, नेहमीच्या निवडणुकीमध्ये थोडी स्पष्टता असायची. कोण कुठे आहे ? आता मात्र अजून मला कळत नाही कोण कुठे आहे ते. कोण कुठून उभा राहतोय, कोण कुठून उभा राहतोय काहीच समजत नाही

लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला. मात्र नंतरच्या काळात महायुतीने फार मोठी आघाडी घेतली आहे. आता आमची खात्री झाली आहे महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, येवला मतदार संघातील रस्त्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे, विकास कामं झालीत, बरचस काम झालं आहे. महिलांना पाणी आणण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही

-कोणीही जरी आलं, तरी एक विरोधी पक्ष म्हणून आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. मी कुणालाही शत्रूपक्ष समजत नाही, विरोधी पक्ष असतात. लोकं ज्या कुणाला निवडून देतील त्याने लोकांची काम करायची, असतात असे ते म्हणाले.

Sameer Bhujbal Joining Mahavikas Aghadi, whay Chhagan Bhujbal said

महत्वाच्या बातम्या