विशेष प्रतिनिधी
Rohit Pawar भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे नैराश्यात आहेत. खूप पैसा खर्च करून आणि प्रत्येक घरामध्ये जाऊनही त्यांचा पराभव झाला आहे. आता ते पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विधानांमध्ये कोणतीही तथ्यता नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. राम शिंदे यांना पराभवाचा स्वीकारवा असा सल्लाही त्यांनी दिला.Rohit Pawar
रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत गुप्त करार केला असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. यावर रोहित पवार म्हणाले, “जर करार केला असेल तर तो मी अजित पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्यासोबत केला आहे का, हे राम शिंदेंनी स्पष्ट करावे. ते हास्यास्पद बोलत आहेत.”
रोहित पवारांनी 2019 च्या निवडणुकीतील राम शिंदेंच्या वागणुकीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “2019 मध्येही त्यांनी अशाच प्रकारे पराभवाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडले होते. आता त्यांच्या डावात काहीच नावीन्य नाही.”
रोहित पवार म्हणाले, “सर्व ईव्हीएम गुजरातमधील आहेत, यामुळे लोक शंका घेत आहेत, असे ते म्हणत आहेत. ही निवडणूक लोकशाहीच्या माध्यमातून पार पडली आहे. पराभव स्वीकारून लोकशाहीला मजबूत करणे महत्त्वाचे आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची सभा झाली नसल्याच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, “अजित पवार बारामतीच्या निवडणुकीत व्यस्त होते. माझ्या मतदारसंघात त्यांनी सभा घेतली नाही, याचे उत्तर मला देता येणार नाही.”
रोहित पवार यांनी राम शिंदेंवर टीका करत त्यांच्या मंत्रीपदाच्या इच्छावरही टोला लगावला. “राम शिंदेंचा प्लॅन म्हणजे पराभवाचा बहाणा करून अजित पवारांवर खापर फोडायचे आणि कुठेतरी मंत्रीपद मिळते का ते पाहायचे. 2019 ला सुद्धा ते अशाचं पद्धतीने बोलेले होते आणि खापर तेव्हा त्यांनी विखे पाटील यांच्या डोक्यावर फोडलं होतं. ते काहीही लेव्हलला जाऊन बोलतायत. हार जित होत असते त्यांनी त्यांचा पराजय स्वीकारावा , त्यांनी खापर न फोडता लोकशाहीला ताकद दिली पाहिजे.