विशेष प्रतिनिधी
Chhagan Bhujbal राज्यातील सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, यावरून कुणालाही अस्वस्थ होण्याची गरज नाही. मंत्रीमंडळ विस्तार आणि नियुक्त्यांबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात असले तरी अंतिम निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले, “मला काहीजणांनी मंत्रीपदांसाठी काही नावं पाठवली आहेत, पण हे फक्त अंदाज आहेत. अंतिम निर्णय अजित पवार घेतील.” तसेच, पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष सध्या दिल्लीत असल्यामुळे अजित पवार स्वतः दिल्लीला जाऊन चर्चा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्रीमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, यावेळी आमदारांची संख्या जास्त असल्याने समतोल साधण्यात अडचणी येत आहेत. “भाजपचा स्ट्राईक रेट पहिल्या क्रमांकावर आहे आणि आम्ही दुसऱ्या क्रमांकावर. त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटच्या तासात जास्त मतदान होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “याआधी देखील शेवटच्या तासात जास्त मतदान झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये काहीही गैर नाही.”
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानसन्मान राखला जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. “शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवरच आमचे सरकार काम करत राहील,” असेही त्यांनी नमूद केले.
छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय अस्वस्थता दूर करण्यासाठी सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. “सर्वजण आपले काम करत असून राज्यातील प्रशासकीय कामे सुरळीतपणे सुरु आहेत,” असे त्यांनी सांगितले.
No one needs to be upset about the formation of the government, Chhagan Bhujbal clarified
महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- फेरपडताळणीचा फायदा होणार नाही, EVM मशीनमध्ये प्रोगाम फीट आहे का हे तपासावे लागणार
- BJP : सावंत, राठोड, सत्तार आणि केसरकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून महायुतीत खरखर
- Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले – माझ्या नेतृत्वात 82 जागा आल्या होत्या, बाबांनी 82 च्या 42, पटोलेंनी 42 च्या 16 केल्या
- Imtiaz Jalil : ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा