MLA Suresh Dhas : आमदार सुरेश धस म्हणाले मोर्चात सहभागी झालो नाही तर लोकं जोड्याने मारतील

विशेष प्रतिनिधी

बीड : MLA Suresh Dhas  आम्ही मोर्चात सहभागी झालो नाही तर लोकं जोड्याने मारतील. जिल्ह्यात सात आमदारांपैकी पाच आमदार मोर्चात सहभागी होणार आहेत असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.मुख्य आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणीही धस यांनी केली.MLA Suresh Dhas

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीड येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. याबाबत बोलताना आमदार धस म्हणाले, या प्रकरणातील मुख्य आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे.



खंडणीच्या गुन्ह्यात आकाचे नाव आहे, या गुन्ह्यात लवकर जामीन मिळतो. ज्या अर्थी आका खंडणीच्या आरोपामध्ये सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा अर्थ खुनाच्या गुन्ह्यात देखील त्याचा हात आहे. त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे. यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन सीडीआर तपासले पाहिजे

आमदार धस म्हणाले, कुणाच्या बापासाठी कुणी दाढी पण करत नाही. पण बीड जिल्ह्यातील कुणीतरी मंत्री मंडळात आहेत. त्यामुळं पोलिसात भीती असू शकते.

अंजली दमानिया यांना उत्तर देताना धस म्हणाले,

हा मोर्चा ड्रामा नाही. त्या बाहेरील आहेत. त्यांना बीड जिल्ह्यातलं काय माहिती आहे ?

MLA Suresh Dhas said if we do not participate in the march, people will beat us

महत्वाच्या बातम्या