अजित पवारांनी डावलले, काँग्रेसने नाकारले, परिवर्तन महाशक्तीला विद्यमान आमदार उमेदवार मिळाले

विशेष प्रतिनिधी

विद्यमान आमदार असूनही उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी परिवर्तन महाशक्तीत प्रवेश केला आहे.
मनोहर चंद्रिकापुरे यांना डच्चू देत एक दिवसापूर्वी भाजपमधून आलेल्या राजकुमार बडोले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज चंद्रिकापूरे यांनी उमेदवारीसाठी प्रथम काँग्रेसकडे धाव घेतली, पण तेथून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. या पक्षाकडून ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

मनोहर चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (अजित पवार)विद्यमान आमदार आहे. अजित पवारांनी यांनी बंड केल्यावर ते त्यांच्यासोबत गेले होते. परंतु त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी भाजपमधून आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असतानाही डावलण्यात आल्याने चंद्रिकापूरे अस्वस्थ झाले. त्यांनी कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी किंवा तिसरी आघाडीचा पर्याय डोळ्यासमोर ठेवला. एवढेच नव्हेतर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी देखील केली.

Ashok Pawar vs Mauli Katke : अशोक पवार विरुद्ध माऊली कटके, प्रदीप कंद यांचा पत्ता कट की स्वतःहून माघार

नाराज चंद्रिकापूरे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचा बराच प्रयत्न केला. विशेषत: काँग्रेसकडून निवडणूक लढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी आज, गुरुवारी नागपूर गाठले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत अजूनही जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही.

काँग्रेसकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने चंद्रिकापुरे यांनी अखेर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीकडे मोर्चा वळवला व गुरुवारी त्यांनी या पक्षात प्रवेश केला. आता ते अर्जुनी मोरगाव मधून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Manojar Chandrikapure in parivartan mahashaki

महत्वाच्या बातम्या