विशेष प्रतिनिधी
बीड : कुणाचाही बाप येऊ दे. मस्साजोग प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Manoj Jarange warns about santosh deshmukh
जरांगे पाटील हे उद्या परभणी आणि मस्साजोग येथील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनता 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर कोणताही जहागिरदार आला तरी हे प्रकरण दाबू देणार नाही आणि मी हटणारही नाही असं जरांगे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे की कुणालाही सोडणार नाही. पण कधी ? यांना तपासाला इतका वेळ का लागतो आहे ? असे देखील जरांगे म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. तर याच मुद्यावरून आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने तातडीची बैठक बोलवली आहे.\
Manoj Jarange warns about santosh deshmukh
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा