Mahavikas Aghadi महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गटाच्या नेत्यांचा स्वबळाचा नारा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे महाविकास आघाडीतील पक्ष या पराभवाचं मंथन करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

येणाऱ्या काळात निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराजी आहे. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे.

ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटलं आहे महानगर प्रमुखांची माहिती आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना मागणी करणार आहे, असं शिंदे म्हणाले.

Mahavikas Aghadi, Thackeray group leaders’ slogan of independence

महत्वाच्या बातम्या