विशेष प्रतिनिधी
मुंबई : Madhukar Pichad भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. Madhukar Pichad
मधुकर पिचड 1980 ते 2009 अकोले मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते भूषविले होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. मधुकर पिचड यांनी 1961मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. Madhukar Pichad
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास
पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. त्यांनी 1980 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम केले. Madhukar Pichad
काँग्रेसपासून, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास
मधुकर पिचड यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. मधुकर पिचड यांनी 2019 ला आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
विविध खात्यांची जबाबदारी पाडली पार
मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती
Madhukar Pichad passed away
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : महायुतीत मुख्यमंत्री कोण??, उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब; निर्णय सगळे एकत्रच; फडणवीसांच्या ग्वाहीने शिंदे खुश!!
- Devendra fadnavis : नो सरप्राईज, देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब!!
- GST collection : साबण आणि तेलासारख्या दैनंदिन वस्तूंमधून 75% GST कलेक्शन, अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिली माहिती