विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सहा जागा होणार रिक्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Legislative Council निवडणूक काळात बंडखोरी शमविण्यासाठी, नाराजी काढण्यासाठी अनेकांना विधान परिषदेवर आमदारकी देण्याचे आश्वासन दिले गेले. अनेकांबाबत हे प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. Legislative Council will become vacant

विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाले.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

एकाचवेळी दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. १) आमश्या पाडवी, शिवसेना, २) प्रवीण दटके, भाजपा,३) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा, ४) राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ५) रमेश कराड, भाजपा आणि ६) गोपीचंद पडळकर, भाजपा हे विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाले आहेत. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्य असलेल्या आणि आता विधानसभेवर निवडून गेलेल्या या ६ सदस्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Legislative Council will become vacant

महत्वाच्या बातम्या