Jitendra Awhad जितेंद्र आव्हाडांचे ईव्हीएम वर काही बोलायचे आहे पण बोलणार नाही!

जितेंद्र आव्हाडांचे ईव्हीएम वर काही बोलायचे आहे पण बोलणार नाही! Jitendra Awhad

विशेष प्रतिनिधी

सातारा : महाराष्ट्रातील जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल यात 100 टक्के अंतर आहे, असे मत माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. Jitendra Awhad

ते म्हणाले, अनपेक्षित निकाल आहे महाराष्ट्रात सगळेच बोलताय आम्हीच नाही. महाराष्ट्रातील जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल यात 100 टक्के अंतर आहे, असं महाराष्ट्रातील जनताच म्हणते. आम्ही अजून ईव्हीएम वरती काहीच बोललेलो नाही. आम्ही कशावरच काही बोललो नाही.



आव्हाड म्हणाले, ज्या आमच्या सभा झाल्या त्यात लाखोलाखो लोक आली होती. तिथे आम्हाला स्पष्ट दिसत होते. असं कधी संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली चळवळीची तेव्हा कधी असं झालं नाही. 1977-80 साली असं कधी झालं नाही 89 सालीही नाही , असा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात कधी लागला नाही.

विरोधी पक्ष नेते ताकदीने लढले. सत्ताधारी पण ताकदीने लढले. पण विरोधी पक्षाचे प्रमुख उमेदवार पडले, ही आर्श्चयाची बाब आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता लगेच घेतील, असे ते म्हणाले. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल त्यानंतर आज पर्यंतच्या निवडणूकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी अशी काही निवडणूक जिंकली नाही की विरोधी पक्ष फार धुळीस मिळाला आहे. त्यावेळी काँग्रेस सत्ताधारी होती पण त्यांनी विरोधी पक्षासोबत अशी कधी निवडणूक जिंकली नाही.

Jitendra Awhad Hints at EVM Issues but Chooses to Stay Silent!

महत्वाच्या बातम्या