Nana Patole महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरु, नाना पटोले यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरु असल्याचं आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले, परभणीत दलितांवर लाठीचार्ज झाला, लोखंडी सलाखीने जनावरा सारख मारलं. हा पाशवी बहुमताचा असर आहे का? आता यांना लोकांची गरज नाही. त्यांना वाटतं की आता आपण मशीनने जिंकू शकतो. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी असे सांगून सुद्धा ज्या तीन लोकांनी शपथ घेतली आहे त्यांचे फक्त मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरु आहे.

लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई व्हावी.लोकांनी हक्काची लढाई करावी, हा प्रकार महाराष्ट्रमध्ये चालणार नाही, बेबंदशाही, हिटलरशाही कॉंग्रेस चालू देणार नाही.

वडेट्टीवारांनी सांगितल्याप्रमाणे कोणतेही लाट नव्हती व या निवडणूक निकलाच्या धक्क्यातून राजकीय पक्ष नव्हे तर महाराष्ट्रातील जनता बाहेर आलेली नाही असे सांगून पटोले म्हणाले, राजकीय पक्षात आरोप होतात, काँग्रेसमध्ये असे होत असे नाही, पक्षाअंतर्गत बाबी पक्षातून सोडवले जातात. मीडियाच्या माध्यमातून नाही. संपूर्ण कॉंग्रेस पक्षाचा निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले, त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे, ही आत्मचिंतनाची वेळ आहे.

संविधानावर चर्चा होत असताना, जागतिक पातळीवर मतदान होत असतानाच बॅलेटवर मतदान झालं पाहिजे, ही भावना जनतेची आहे. ती लढाई उभी झाली पाहिजे. अनेक राजकीय पक्षांचे म्हणणं आहे. बॅलेटवर निवडणूक व्हावी, त्यात फोटो असावे अशी गरज वाटत नाही, वैयक्तिक स्तरावर आपआपले आंदोलन करत आहेत.

Fight for creamy ministerials post in Mahayuti, Nana Patole’s allegation

महत्वाच्या बातम्या