Mahayuti Goverment : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, यांचा पत्ता कट तर यांना लागू शकते मंत्रीपदाची लॉटरी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून त्यात भाजप २१, शिवसेना १३, राष्ट्रवादी अजित पवार गट ९ अशा एकुण ४३ मंत्र्याचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्यात भाजपचे १७, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ मंत्री शपथ घेणार आहेत. १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोण कोणती खाती मिळणार हे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिलीप वळसे पाटील तर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार आहे.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी

भाजपकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती असणार आहे.

शिवसेने शिंदे गटाच्या वाटयाला महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाणार आहे.

चंद्रशेखर बाबनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर हे असू शकतात. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके यांना संधी मिळू शकते.

Expansion of the cabinet of Mahayuti Goverment

महत्वाच्या बातम्या