Mahavikas Aghadi बाजारात तुरी अन्…विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत मतभेद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बाजारात तुरी अन् या म्हणीची प्रचिती सध्या महाविकास आघाडीमध्ये येत आहे. महाविकास आघाडीतील एकही पक्षाला एकूण जागांपैकी १० टक्के जागाही मिळाल्या नाहीत. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती होणार की ते पद रिक्त राहणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण जर या पदावर नियुक्ती होणार असं ठरलं तर मविआतील कोणत्या पक्षाचा नेता विरोधी पक्षनेता होईल? यावरुन आता मतभेद असल्याचं समोर आलं आहे. disagreement in Mahavikas Aghadi

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. आता अध्यक्षांचा हा अधिकार आहे की, कोण विरोधीपक्ष नेता होईल. साधारणपणे ज्या विरोधीपक्षाकडं सर्वाधिक जागा आहेत त्याचा विरोधीपक्ष नेता होतो. पण त्यासाठी एकूण जागांपैकी किमान १० टक्के जागा मिळणं गरजेचं आहे.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी

या नियमानुसार विरोधी पक्षांच्या आघाडीतील एकाही पक्षाला १० टक्के जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची नेमणूक केली जाईल किंवा नाही? असा पेच निर्माण झाला आहे. पण आमदारांची संख्या कमी असली तरी अध्यक्ष विशेषाधिकाराद्वारे विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करु शकतात.

त्यामुळं जर विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर कोण विरोधीपक्ष नेता होईल, यावरुन आता मविआत एकमत होत नाही. कारण सध्या विधानपरिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळं आता विधानसभेवर काँग्रेसचा विरोधी पक्षानेता असावा असा सूर काँग्रेस नेत्यांचा आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असली तरीही काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता व्हावा यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत.

disagreement in Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या