धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला अपघात, सुखरूप बचावल्या

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला अपघात झाला. घटना गुरूवारी (दि.१७) पहाटे घडली. मुंडे यांच्या लॅन्ड कुझर कारने ट्रॅव्हल्स बसला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे या सुखरुप असून त्या दुसऱ्या वाहनाने पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. Dhananjay Munde’s wife’s car accident

राजश्री मुंडे या आपल्या लॅन्ड क्रुझर कारने पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्याजवळील घुले पेट्रोल पंपासमोरुन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस गाडीचा अंदाज न आल्याने मुंडे यांची लॅन्ड क्रूझर कार बसला पाठीमागून धडकली.

धडक इतकी जोरदार होती की, लॅन्ड कुझर कार महामार्ग सोडून रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. सुदैवाने गादी पलटी न झाल्याने राजश्री मुंडे व चालक सुखरुप आ त्यानंतर मुंडे या खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आहेत. या अपघातात त्या सुखरूप असल्याची माहिती मुंडे कुटुंबाने दिली आहे.

Dhananjay Munde’s wife’s car accident

महत्वाच्या बातम्या