Dhananjay Munde धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल, त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची, गद्दारीची!

विशेष प्रतिनिधी

अकोले : Dhananjay Munde मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अहिल्यानगर येथील अकोले येथे आयोजित सभेत बोलताना मुंडे म्हणाले, त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे, असे नाव न घेत शरद पवारांवर टीका केली आहे. Dhananjay Munde

धनंजय मुंडे म्हणाले, तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे. पण त्यांनी केले तर गद्दारी नाही. त्यांच्याच सांगण्यावरून दादा आणि आम्ही केले तर आम्ही गद्दार. अशी टीका शरद पवारांवर नाव न घेत धनंजय मुंडे यांनी केली आहे. Dhananjay Munde


लातूरमध्ये घुमतोय पवन कल्याण यांचा बाय-बाय अमित नारा


पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, अजितदादा आणि आम्ही कुणासोबत गद्दारी केली नाही. आमचे इमान मायबाप जनतेशी आहे. जनतेला विकासाचे जे स्वप्न दाखवले ते पूर्ण करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. 2019 ला भाजप – शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले होते. पण काय खेळ झाला बघा. भाजपपासून कुणाला फोडले? त्याला काय म्हणतात शाहू? त्याला गद्दारी म्हणत नाही ओ. गद्दार कोण? तर आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते. ते मोठे, त्यांनी काहीही केले तर जमतं, असा खोचक टोला मुंडे यांनी लगावला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, समोरा समोर बसायचे असेल तर धनंजय मुंडेंची तयारी आहे. 2017 पासून दिल्लीत काय झाले ते दादांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झाले हे पुराव्यानिशी सिद्ध करेल. आम्हाला गद्दार म्हणू नका. 78 पासून महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी कुणी केली? हे सर्वांना माहिती आहे. आम्ही पुरोगामी विचारांशी कुठलीही तडजोड न करता महायुती सहभागी झालो, ते फक्त विकासासाठी, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde attack on Sharad Pawar, his political career is one of betrayal and betrayal!

महत्वाच्या बातम्या