Rohit Pawar मोठा पराभव झाल्यावरही रोहित पवारांना ईव्हीएमवर संशय!

विशेष प्रतिनिधी

कर्जत जमखेड : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यावर आता ईव्हीएम ला दोष देण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पर गटाचे आमदार रोहित पवार यांनी गुजराती ईव्हीएमवरच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा सवाल केला आहे.

रोहित पवार यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.

निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत. तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा !

रोहित पवार यांनी महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली मते इतकी सारखी कशी असा सवाल केला आहे.

Despite the big defeat, Rohit Pawar doubts about EVMs

महत्वाच्या बातम्या