एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्ष नेते बनवण्याचा कट, अंजली दमानिया यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्ष नेते बनवण्याचा कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Conspiracy to make Eknath Shinde Leader of Opposition, claims Anjali Damania

अंजली दमानिया यांनी दोन पोस्ट टाकून सत्तास्थापनेबाबत वेगळाच दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट आहे का? सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेते अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरे न वाटणे ही भाजपाची स्क्रिप्ट वाटते”

या पहिल्या पोस्टनंतर दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्या म्हणतात, “एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते. ४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.”

दरम्यान सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत आणि मंत्रीपदे अधिक मिळावीत, अशी पवार यांची भूमिका आहे. महायुतीला बहुमत मिळताच अजित पवार यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी गेले चार दिवस फारच ताणून धरल्याने भाजपचे नेतृत्व अजित पवारांना झुकते माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Conspiracy to make Eknath Shinde Leader of Opposition, claims Anjali Damania

महत्वाच्या बातम्या