Congress : काँग्रेस समोरील अडचणी वाढल्या, सोलापुर शहर मध्य मतदारसंघातून मुस्लिम समाजाची बंडाची तयारी

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने मुस्लिम समुदायाला उमेदवारी न दिलास वेगळा निर्णय घेण्याचा दिला इशारा शहर मध्यमुळे कॉंग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहेत .

सोलापूरशहर मध्ये मुस्लिम समुदायातील बारा इच्छुक उमेदवारांनी मागितली उमेदवारी “अभी नही तो कभी नही,माहोल बदलने वाला है” असे म्हणतं महाविकास आघाडीला इशारा देण्यात आला आहे. मुस्लिम समुदायचा उमेदवारी बाबत 20 तारखेपर्यंत महाविकास आघाडीला अल्टिमेटम देण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुस्लिम उमेदवारीबाबत एकजूटदाखवलीय. सोलापूर शहर मध्ये मधून महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार न दिल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

या सर्व इच्छुकांमध्ये एका माजी नगरसेवक मुस्लिम महिलेने ही मागितली आहे उमेदवारी त्यामुळे महाविकास आघाडी यंदा सोलापूर शहर मध्यला कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे झाले आहे.

Congress Faces Growing Challenges as Muslim Community Prepares for Rebellion in Solapur Central Constituency

महत्वाच्या बातम्या