Chandrakant Patil : महायुती सरकार म्हणजे शब्द पाळणारे सरकार

– भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार Chandrakant Patil 

– चंद्रकांतदादांमुळे स्मारकाचे काम मार्गी, वाढणार पुण्याची शान

– महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान

विशेष प्रतिनिधी 

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे, कारण येथे देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

ज्या भिडे वाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तिथे स्मारक व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत होती, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे निर्णय घेता येत नव्हता. भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला.

याबाबत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्मारकाच्या निधीची तरतूद झाल्यानंतर, राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांना याबाबत सविस्तर तपशील सांगितला. तद्नंतर उच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडलेल्या भूमिकेमुळे न्यायालयाने भिडेवाडा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने सकारात्मक निकाल दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे पुण्याच्या वैभवात अधिक भर पडली आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही फक्त पुणेकरांसाठीच नाही, तर समस्त देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महापुरुषांच्या स्मृतीला आदर देण्याचे वचन पूर्ण करत, महायुती सरकारने जनतेची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण केली आहे.

Chandrakant Patil bhidewada national smarak

महत्वाच्या बातम्या