बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता, आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध सीबीआयचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ( डीसीपी ) म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. CBI registered case against IPS Bhagyashree Navtake

नवटक्के यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शहा यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला होता. प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. नवटक्के यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने सुनील झंवर आणि कुणाल शहा यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस महासंचालकांकडून याबाबतचा चौकशी अहवाल गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता.

CBI registered case against IPS Bhagyashree Navtake

महत्वाच्या बातम्या