Beed Mahayuti Candidate बीडची महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, चुलता आणि दोन भाऊ समोरासमोर

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी लढत असलेले त्यांचे चुलत भाऊ विद्यमान आमदार शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि चुलते जयदत्त क्षीरसागर यांच्यात लढत रंगणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढत असलेले जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला होता.

महायुतीमध्ये बीड आणि आष्टीच्या जागेवरून मोठी रस्सीखेच होती. गेवराईची जागा अजित पवारांना सोडल्यामुळे आष्टीत सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली.

Sachin Sawant : सचिन सावंतावर वरुण सरदेसाई भारी, गळ्यात मारली अंधेरी, सावतांनी नाकारली उमेदवारी

बीडच्या जागेवरही राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही होता. पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महायुतीकडून अखेर बीडमधून डॉ. योगेश श्रीरसागरांना उमेदवारी दिली आहे. बीडमध्ये उमेदवारी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशीजयदत्त क्षीरसागरही मैदानात उतरले आहेत .

बीड जिल्ह्यात शेवटच्या दिवशी ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, मोहन जगताप, बाळासाहेब आजबे, पृथ्वीराज साठे, साहेबराव दरेकर, जयसिंह सोळंके, शेख तय्यब, राजेसाहेब देशमुख, एमआयएमकडून शेख शफीक, सादेक इनामदार यांनी अर्ज दाखल केले.

Beed Mahayuti Candidate Dr. Yogesh Khirsagar, Battle of Uncle, and Two Brothers

महत्वाच्या बातम्या