Archana Patil मोठे पोस्टर्स लावून विकास होत नाही, अर्चना पाटलांचा देशमुखांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

लातूर : लातूर शहरात कचरा, पाणी प्रश्न आहे पण आमदार अमित देशमुख पाणी पाजत नाहीत, त्यासाठी आपण त्यांना मतदानाच्या माध्यमातून पाणी पाजू . आमदार कधी आपल्या प्रभागात आले का सभा घेतली का ? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पाटील यांनी विद्यमान आमदार अमित देशमुख यांना केला. लातुर शहर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. लातुरच्या विद्यमान आमदारांनी कधी जि.प. मनपाची बैठकी घेतली नाही. त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. Archana Patil attacked Deshmukh

मतदान हा लोकशाहीचा हक्क आहे. तुम्ही सर्व बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आहोत. महायुतीचे सरकार आल्यावर तुम्हाला आता 1500 ऐवजी 2100 रूपये मिळणार आहेत. त्यासाठी साथ बहिणीला साथ विकासाला पुढील 5 वर्ष लेकराला आई जशी सांभाळते त्याप्रमाणे मी संभाळीन. मोठे पोस्टर्स लावून विकास होत नाही, विकास म्हणजे 1 कारखाना काढून 15 कारखाने करायचे नाही. आमदाराला सामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. असा घणाघात डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुख यांच्यावर चढवला.


Wadgaon Sheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश


दरम्यान, अर्चना पाटील चाकुरकर यांच्यासाठी लातुर शहर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४, लक्ष्मी कॉलनी येथे महायुतीची कॉर्नर बैठक संपन्न झाली. त्या बैठकीतून महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, वाले अप्पा, रिपाईचे जितेंद्र बनसोडे, माधवराव पाटील टाकळीकर, आनंद कोरे, स्वातीताई घोरपडे, मिना ताई गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश बोरा, संदीप मामा जाधव, दिपक बडगिरे, चंद्रकांत शिंदे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Archana Patil attacked Deshmukh

महत्वाच्या बातम्या