विशेष प्रतिनिधी
कऱ्हाड : Ajit Pawar महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत काही फॉर्म्युला वगैरे नाही. आम्ही तिघे बसून चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत काही फॉर्म्युला वगैरे नाही. आम्ही तिघे बसून चर्चा करून निर्णय घेऊ. Ajit Pawar
राज्यातील स्थिर सरकारसाठी सगळे तीन पक्ष एकत्र काम करतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. “लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यांना स्थिर आणि सक्षम सरकार हवे आहे. आम्ही चर्चा करून राज्याला असे सरकार देऊ,” असे पवार म्हणाले. Ajit Pawar
महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशावर समाधान व्यक्त करत पवार म्हणाले, “महायुतीला ज्या प्रकारे लोकांचा पाठिंबा मिळाला आहे, अशी लाट यापूर्वी कधीही आली नव्हती. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व, चांगल्या योजना आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मतदारांनी आम्हाला भरभरून साथ दिली.”Ajit Pawar
अजित पवार यांनी विरोधी पक्षांच्या कमकुवत स्थितीवर टिप्पणी करताना सांगितले, “आता आम्हाला प्रचंड बहुमत आहे. विरोधकांकडे विरोधी पक्ष नेते बनवण्या इतपतही संख्याबळ नाही. त्यामुळे आम्हावर मोठी जबाबदारी आहे.”
कराडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार केला. यावर अजित पवार म्हणाले, “आपल्या संस्कृतीमध्ये वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं ही परंपरा आहे. आमची कदाचित शरद पवार यांच्याशी भेट झाली असती, पण ती झालेली नाही. मात्र, त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे.”
यशवंतराव चव्हाण यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “शिस्त, विरोधकांना सन्मान, साहित्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राशी समरस होऊन त्यांचे प्रश्न समजून घेणं ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांनी सुरु केली. महाराष्ट्र याला कधीही विसरू शकत नाही,”
राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा कायमस्वरूपी शिवशाहू-आंबेडकर विचारांशी जोडलेली असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही महायुती सरकारमध्ये काम करत असलो तरी आमचे नेतृत्व या विचारधारेने प्रेरित असेल.”