Ajit Pawar : अजित पवारांना रुपाली चाकणकर यांच्या कौतुकाचीही भीती, पोस्ट केली डिलीट

विशेष प्रतिनिधी

महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पुणे शहरातून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेली पोस्ट डिलीट केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यामुले अनेक जण नाराज आहेत. रुपाली चाकणकर यांना दुसऱ्यांदा राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे पक्षातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेही नाराज झाल्या. रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक व्यक्ती एक पदाचा मुद्दा उपस्थित करत पक्षाकडे नाराजी व्यक्त केली, त्यावर रुपाली चाकणकर यांनी बाहेरच्यांनी बोलू नये, असा टोला रुपाली चाकणकरांनी लगावला. यावर रुपाली ठोंबरेंनी पुन्हा पलटवार केला. छान साडी नेसून काही होत नाही, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या होत्या.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रूपाली चाकणकर यांचे कौतुक करणारी पोस्ट डिलीट केली.

रुपाली, स्वतःला घडवू पाहणाऱ्या, जीवनात काहीतरी करू पाहणाऱ्या महिला वर्गासाठी तू एक आदर्श आहेस. कर्तृत्वाच्या बळावर तुझी कारकीर्द आणखी मोठी होइल, यात काही शंका नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे ! असे अजित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

Ajit Pawar deleted post about Rupali Chakankar

महत्वाच्या बातम्या