विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे, असा इशाराउद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले,आज पहिल्यांदा बैठक घेतोय. सर्व गोष्टींवर आजच्या बैठकीत अनेक उद्योगपतींसोबत चर्चा करणार आहे. राज्यभर उद्योग भवन उभारण्याचे काम हाती घेणार आहोत. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात अनेक कंपन्या आणल्या. मराठवाड्यात देखील अनेक गुंतवणुकी आणल्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक प्रकल्प आणले, माझ्या मतदार संघात देखील एक मोठा कारखाना येत आहे. त्याचं काम सुरु झालं आहे
सामंत म्हणाले, पुणे, गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्याला टाटा समूहाकडून सीएसआर मधून ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत.
मराठी माणसाला जर मारहाण होत असेल तर कारवाई करू असा इशारा देत सामंत म्हणाले, महाराष्ट्र हे सगळ्या जातींना घेवून चालणारे राज्य आहे. अशा लोकांचा कडेकोट बंदोबस्त सरकार करेल .
विरोधकांनी फेक नऱ्हेटिव सेट केला होता. कुठलेही उद्योग राज्याबाहेर गेले गेले नाहीत. त्यांच्या काळात काम झालं नाही म्हणून हे प्रकलप बाहेर गेले . चर्चा न झाल्याने त्यांच्या काळात एयरबस हा प्रकल्प गेला. याबाबत व्हाईट पेपर का काढला नाही असा सवाल सामंत यांनी केला.
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
नाणार आणि बारसू प्रकल्पाबाबत ते म्हणाले, कंपनी यायला जर तयार असेल तर प्रयत्न करणार. आमच्यासोबत चर्चा करणारं असं राणे म्हणाले आहेत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, चर्चा करून मार्ग काढू. नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा २०१९ च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही असं सांगितलं होते. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र केंद्राला लिहिलं होते पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल. लोकांमध्ये जावून लोकांशी चर्चा करणार आहे.
पालकमंत्री पद वादाबाबत सामंत म्हणाले, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याचे काम 99% संपलं आहे. चार दिवसात यादी समोर येईल.
बंगला वाटपावरून कोणताही वाद नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,- आमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले आहेत. फ्लॅट सुद्धा दिले गेले आहेत. आमच्या मध्ये बंगल्यावरून वाद होणार नाही हे नक्की.
महापालिका निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले,शिवसेना पुणे महानगरपालिकेत सत्तेत येईल असेच काम करू. पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही. तानाजी सावंत मला सिनियर आहेत. मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील त्यांची नाराजी नक्की दूर करू .आमचं कुटुंब आहे एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख आहेत, असे त्यांनी सांगितले. बीड आणि परभणी बद्दल बाकीच्यांचं मला माहिती नाही. आम्ही शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचू. त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Action should be taken if anyone is threatning the industries, Uday Samant warns
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा