Triple talaq गर्भवती पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे फोन करून तिहेरी तलाक, पतीवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील एक पत्नी एकटीच मोर्निग वॉकला गेल्याने संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितले. या प्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. Triple talaq

सध्या याप्रकरणी पोलीस गुन्हा नोदवून पतीला नोटीस पाठवत पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार 27 जानेवारी 2024 रोजी कुर्ल्याच्या अलिखान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता. ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आईवडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती. 10 डिसेंबर 2024 रोजी अलिखानने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचे समजले. यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितले.

Chhagan Bhujbal छगन भुजबळ म्हणाले- राष्ट्रवादीत अजितदादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, पूर्वी मला ठाकरे-पवार विश्वासात घ्यायचे

मात्र, परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचे सांगताच पतीने फोन ठेवला.महिला घरी पोहोचल्यावर अलिखानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितले. कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला. या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मुंब्रा पोलिसांनी पती अलिखान विरोधात ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला नोटीस पाठवली आहे. मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळे कारण आहे, हे तपासले जात आहे, असे तपास अधिकारी रविंद्र पाखरे यांनी सांगितले.

Triple talaq on mobile phone

महत्वाच्या बातम्या