Sanjay Raut खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची अज्ञात व्यक्तीकडून रेकी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या घरा जवळ अज्ञात इसमाने आज सकाळच्या सुमारास रेखी केलेल्याचे आढळले आहे. या आधी देखील संजय राऊत त्यांना काही महिन्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती.

आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात दोन इसम हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील बंगल्या जवळ येऊन बंगल्याची पाहणी केल्याचे आढळून आले. त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला कळवले असता सीसीटीव्ही आणि गाडीचा नंबर चेक नक्की कुठल्या विभागातली आहे हे तपासात आहे सीसीटीव्ही मध्ये पाहिलं असता मागील जो बाइक वर बसला आहे त्याच्याकडे दहा हुन अधिक मोबाईल असल्याचे दिसून येत आहे.

खासदार राऊत मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडूपमध्ये राहतात. सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या घराची रेकी केली. आता पोलीस राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

रेकी करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. राऊत यांच्या बंगल्याची रेकी करणारे दोघे नेमके कोण आहेत, ते त्यांच्या बंगल्याच्या परिसरात का आले होते, त्यांचा हेतू नेमका काय, या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत. त्यासाठी पोलीस सध्या राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.

संजय राऊत यांच्या घराची रेकी करणाऱ्या दोघांनी निवासस्थानाचे काही फोटो टिपल्याचा दावा राऊत यांचे बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी केला. सुनील राऊत यांनीच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Reiki of MP Sanjay Raut’s bungalow by unknown person

महत्वाच्या बातम्या