Nihon Hidankyo : जपानच्या निहोन हिदांक्यो संस्थेला शांततेचा नोबेल जाहीर; जगाला अण्वस्त्रमुक्त करण्याचा प्रयत्न केल्याने सन्मान

वृत्तसंस्था

स्टॉकहोम : निहोन हिदांक्यो या जपानी संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगात अण्वस्त्रांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा म्हणतात.

हे हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.

6 ऑगस्ट 1945 रोजी रात्री 8:15 वाजता अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर अलोना गे विमानातून अणुबॉम्ब टाकला. 43 सेकंद हवेत राहिल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यानंतर लगेचच आगीचा मोठा गोळा उठला आणि आजूबाजूचे तापमान 3000 ते 4000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

रतन टाटा गेल्यानंतर वारसा कोण सांभाळणार?, एन. चंद्रशेखरन यांच्यासह सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव पुढे

स्फोटामुळे इतका जोरदार वारा निर्माण झाला की 10 सेकंदात हा स्फोट संपूर्ण हिरोशिमामध्ये पसरला. स्फोटानंतर काही मिनिटांतच 70 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी अमेरिकेने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बला फॅट मॅन असे नाव देण्यात आले. हिरोशिमावर पडलेल्या बॉम्बचे नाव लिटल बॉय होते.

4500 किलो वजनाचा, फॅट मॅन 6.5 किलो प्लुटोनियमने भरलेला होता. नागासाकी येथे रात्री 11.02 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अण्वस्त्र हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले.

Nihon Hidankyo Awarded Nobel Peace Prize

महत्वाच्या बातम्या