D Y chandrachud : डी. वाय.चंद्रचूड १० नोव्हेंबरला होणार निवृत्त, संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश

विशेष प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्त होणारे सरन्यायाधीश पुढच्या सरन्यायाधीशाची सरकारकडे शिफारस करत असतात. त्याप्रमाणे चंद्रचूड यांनीही आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरकराने खन्ना यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला तर ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. D Y chandrachud will retirement

प्रक्रियेनुसार शुक्रवारी केंद्र सरकारने सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यास सूचविले होते. त्यानंतर चंद्रचूड यांनी न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली. सरकारने संजीव खन्ना यांच्या नावाची घोषणा केली तर ते पुढचे सरन्यायाधीश असतील.

परंतु खन्ना यांच्याकडे केवळ सहा ते सात महिन्यांचा कालावधी असणार आहे. कारण १३ मे २०२५ ही त्यांच्या निवृत्तीची तारीख आहे.
विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी १० नोव्हेंबर २०२२ रोजी पदभार स्वीकारला होता. दोन वर्षे त्यांनी सरन्यायाधीश पदाची ही जबाबदारी सांभाळली. आता १० नोव्हेंबर २०२४ रोजी चंद्रचूड निवृत्त होत आहेत.

D Y chandrachud will retirement

महत्वाच्या बातम्या