Prakash Solunkhe : प्रकाश सोळुंखे यांचाही धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल, बीडमध्ये जे काही घडलं आहे याला त्यांची कार्यपद्धती जबाबदार

विशेष प्रतिनिधी

बीड : धनंजय मुंडेंनी गेली पाच वर्षे वाल्मिक कराडला पूर्ण अधिकार दिले होते. कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्याचे त्यावेळी कौतुकही करण्यात आले होते, ते जगजाहीर आहे. त्यामुळे बीडमध्ये जे काही घडलं आहे, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार आहे, असे माझे मत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांनी आपल्याच पक्षाचे आमदार मुंडेंवर केला आहे.

आमदार प्रकाश सोळुंखे म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेच्या 19 दिवसांनंतरही आरोपी पकडले जात नाहीत, यामुळे बीडमधील जनतेच्या मनात मोठा उद्रेक आहे. हे केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळे घडत आहे, अशी जनतेच्या मनातील शंका आहे आणि ती रास्त आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत, ते धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत. त्यांना पकडण्यासाठी एवढी दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य माणूस अस्वस्थ झालेला आहे, त्यामुळे बीडमधील सर्वसामान्य माणूस आज मूक मोर्चात सहभागी झालेला आहे.


Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन


वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे राजकारण सांभाळत असल्याने, त्यांच्यावर मुंडेंचा प्रचंड विश्वास असल्याने ही कदाचित आज हे झाले असेल. पण, आज खंडणीच्या गुन्ह्यात कराड याचे नाव आहे. प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत की, त्याचा मोठा हस्तक्षेप होता. थेट आदेश देऊन काम करायला लावायचे, अशी त्याची प्रथा परंपरा होती. कराड याचे नाव खंडणीच्या प्रकरणात आलं आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणालाही हे खंडणीचे प्रकरण कारणीभूत आहे, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

बीडमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आम्ही आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातलेली आहे. गेल्या पाचपैकी चार वर्षे धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात आणि पालकमंत्री होते. त्यांनी बीड जिल्ह्यात जी काही व्यवस्था निर्माण केली, त्यात महत्वाचं नाव वाल्मिक कराड हे होते. त्याला कार्यकारी पालकमंत्रीही म्हटलं जायचं, असा दावाही साळुंखे यांनी केला

Prakash Solunkhe also attacked Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या