Anjali Damania : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

विशेष प्रतिनिधी

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा फोन आला होता असे दमानिया म्हणाल्या.

पत्रकारांशी बोलताना दमानिया म्हणाल्या, राजकारणात जी गुंडागर्दी आली आहे ती संपायला पाहिजे. देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी वाल्मीक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. या प्रकरणातील तीन आरोपी जे फरार आहेत आणि सुरेश धस ज्यांना आका म्हणतात यांना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत.

कुठलीही घटना घडली की पहिला डायलॉग असतो की त्याची उच्चस्तरीय चौकशी होईल, असे सांगताना दमानिया म्हणाल्या आता या ही प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एसआयटी स्थापन होईल. अशी एसआयटी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात स्थापन झाली होती . बदलापूर प्रकरणात देखील झाली होती पण साध्य काय झाले? कोणाला अटक झाली? काहीही होत नाही. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हे सगळं बोललं जाते.

एका व्यक्तीने काल रात्री फोन केले आणि नंतर वॉईस मेसेज टाकला.ज्यात त्याने असं म्हटले आहे की तिन्ही आरोपी सापडणार नाहीत .कारण तिघांची हत्या झाली आहे. हे खरं आहे की खोटं हे मला माहित नाही. याबाबत एसपींकडे माहिती दिली आहे

Murder of three fugitive accused in Santosh Deshmukh murder case, sensational claim of Anjali Damania

महत्वाच्या बातम्या