Sanjay Raut : लाडक्या बहिणीनं दीड हजार रुपये देण्यासाठी भाऊ आणि नवरे दारुडे करणार, संजय राऊत यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut लाडक्या बहिणीनं दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे दारुडे करणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.Sanjay Raut

ड्राय डे कमी करण्यावरून अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना राऊत म्हणाले, लाडक्या बहिणीना पैसे देण्यासाठी घराघरात दारू पोहचविण्याची योजना आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावला जात आहे. अजित पवार असे करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावतात विचार करावा.



लाडकी बहिण योजनेचे निकष बडलण्यावर ते म्हणाले, निवडणुकींच्या आधी मतांसाठी तुम्ही कोणते निकष लावले नाही.आता निकष लावले जात आहे. बहिणीनी चिंतन केले पाहिजे की कोणते विष आपण आणत आहोत.

बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावावे.पण अशी तरतूद आपल्याकडे नाही. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी जायला हवं. ते गृहमंत्री आहेत.त्यांच्या लाडक्या धनु भाऊ सोबत जायला हवं. बीड आणि परभणी या घटनेवर फडणवीस हे थातुरमाथुर उत्तर देत आहे. बीड चा आरोपी तुमच्या मंत्री मंडळात आहे. परभणीचा आरोपी पोलीस दलात आहे.

अटल वाजपेयी यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, अटलजी हे दुसरे नेहरू होते. ते नेहरू यांचे भक्त होते.स्वतः नेहरू यांनी अटलजी यांना आशीर्वाद दिले. राज धर्माच पालन कसे करायचं हे अटल जी यांच्याकडून शिकावं. जो पर्यंत अटल जी यांच्याकडे भाजपची धुरा होती तेव्हा तो एक सर्वसमावेशक पक्ष होता.पण आता बघा. बाळासाहेब यांच्या साठी अटल जी आणि अटल जी यांचा शब्द बाळासाहेबांसाठी मानला जात होता.

Sanjay Raut alleges that brother and husband will do drunk to pay Ladki Bahin

महत्वाच्या बातम्या