Ladki Bahin Yojana : म्हणून आता लाडक्या बहिणींना मिळणार दीड हजार रुपयेच

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.Ladki Bahin Yojana

2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.



राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर अन् नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात असून हफ्ता वितरण करत असताना 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश असणार आहे , अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ज्या महिलांना आधार कार्ड सिडींग मुळे वंचित राहावं लागत होतं त्यांच्या आधार सिडिंग झालेल्या महिलांच्या खात्यात सुद्धा हे पैसे येत्या चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने याच वितरण होऊन जाईल. 2 कोटी 34 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे
लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांमुळे मिळत आहे, असेही तटकरे म्हणाल्या आहेत.

So now the beloved sisters will get only one and a half thousand rupees

महत्वाच्या बातम्या