Thackeray leaders : ठाकरेंच्या नेत्यांचे महाजनांना साकडे, मला बी संगतीला येऊ द्या ना!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाची तयारी दाखविली आहे. मला बी संगतीला येऊ द्या ना!

असे साकडे ठाकरेंच्या नेत्याने मंत्री गिरीष महाजनांना घातले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यंदाच्या निवडणुकीत भाजप 132 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांच्या महायुतीशी जुळवून घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.


Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!


या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, स्थानिक आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक जिल्ह्यात महायुतीचा मोठा विजय झाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी तब्बल 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विधानसभा निवडणुकीसारखेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी महायुतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून आता महाविकास आघाडीतील पदाधिकारी महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thackeray leaders to Mahajana, take us with you

महत्वाच्या बातम्या