विशेष प्रतिनिधी
बीड : बीडचा पालकमंत्री पद कोण यासंदर्भात मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू. मात्र बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. Devendra Fadnavis
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यांपेक्षा सेफ राज्य आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर असे राजकारण करणे शोभत नाही. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. जाती-जातीत द्वेष निर्माण करायचा आहे Devendra Fadnavis
काँग्रेस अमित शाह यांच्या वक्तव्यावर आंदोलन करत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा काँग्रेसने माफी मागावी. कारण अमित शाहांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ त्यांनी वाया घालवला.
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
संसदेत मोदींनी काँग्रेसला एक्सपोज केलं की काँग्रेस आणि त्यांचे वरिष्ठ नेते यांनी कसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला आहे हे मोदींनी जगासमोर आणले. त्यानंतर गोंधळलेली काँग्रेस आता देशासमोर नाटक करत आहेकाँग्रेसने कधीही आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही.
इंदू मिल जागेवर स्मारकासाठी इंचभर जागा ही मिळाली नाहीनरेंद्र मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर 2 हजार कोटींची मोठी जमीन मिळाली. बाबसाहेबांचे लंडनचे घर आम्ही घेतले आणि बाबासाहेबांच्या स्मृतीला जपण्याचे काम केले. कॉंग्रेसला फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरुन राजकारण करायचे आहे
आणेवारी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याकडे स्टॅंडिंग आदेशच आहे, जी काही आणेवारी आली असेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो.
Chief Minister Devendra Fadnavis warns that no bully will be allowed to continue in Beed
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा