Sanjay Shirsat : राज यांचा टाळी देण्याचा प्रयत्न मात्र उध्दव ठाकरे हात मागे, एकत्र येणे अशक्य, संजय शिरसाट यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat लग्नात भेटले म्हणून राजकारण तापायच काही कारण नाही. हे करायचं असत तर विधानसभेत झालं असतं. राज ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळा टाळी देण्याचा प्रयत्न केला परंतू उध्दव ठाकरे हात मागे घेण्याच काम केलेल आहे, त्यामुळे ते कधीही एकत्र येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.Sanjay Shirsat

छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागपूर अधिवेशनात मंत्रिमंडळात शपथविधी झाल्याचा आनंद व्यक्त करताना, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या नवीन जबाबदाऱ्या पेलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.



 

सामाजिक न्याय खात्यातील योजना आणि आव्हाने

शिरसाट यांनी सांगितले की, उद्यापासून दौऱ्यांना सुरुवात होणार असून, मस्साजोग आणि परभणी येथे उदय सामंत यांच्यासह ते उपस्थित राहणार आहेत. वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असून, सामाजिक न्याय खात्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, किती वेळेला उत्तर देऊ? पालकमंत्री मीच होणार आहे. छ संभाजीनगर मध्ये ६ महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत. ज्यात अवैध धंदे, गुंडगिरी, जमीन बळकावणे यावर आळा घालणार आहे. गुंडगिरी करणारा कुणीही असो कोणत्याही जातीचा पक्षाचा असो कारवाई केली जाईल. आता कोणतही प्रकरण दाबल जाणार नाही. जो सापडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. याचा प्रत्यय एक महिन्यात येईल. गुंडगिरी थांबवून उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करणार आहे.

जिल्हा नियोजन समिती बैठकीत शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही देत शिरसाट यांनी मंत्रिपदाबाबत समाधान व्यक्त केले. “जे काम करणार नाहीत, त्यांचे मंत्रिपद ६ महिन्यांत जाईल,” असे ते म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवस साजरीकरणावर भाष्य करताना, “त्यांचा वाढदिवस फक्त शहरापुरता नाही, तर मुंबईतही होतो. यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

Raj’s attempt to applaud, but Uddhav Thackeray’s hands behind, impossible to unite, Sanjay Shirsat said

महत्वाच्या बातम्या